भाजपचे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांची भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कल्याणचे राजकीय वातावरण बदलणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे. कल्याण लोसभेचे आमदार श्रीकांत शिंदे आहेत. त्यामुळे ही निवड भाजपसाठी महत्वाची मानली जात आहे.
भाजपकडून मुंबई काबिल करण्यासाठी योग्य ते राजकीय डावपेच सुरू केले आहे. त्यामुळे भाजपकडून स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांला देखील भेटी गाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र कल्याण पूर्वमध्ये वैभव गायकवाड यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. या भागतून गणपत गायकवाड हे तीनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यावेळी वैभव राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र आता निवड झाल्याने राजकीय समीकरणे बदलण्यास नक्कीच भाजपला मदत होणार आहे.
पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सद्या देशभर भाजप कडून वेगवेगळे मिशन राबवले जात आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना यात समावेश आहे. प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे. भाजपच्या या नियोजनाचा येणाऱ्या काळात पक्षाला नक्कीच फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
