जेवढे विरोधक अधिवेशन चालवतील तेवढेच आम्ही चालवू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महाविकास आघाडीच्या काळातच कंत्राटी भरतीचा जीआर झाला. यावर मी कालच सविस्तर बोललो आहे. त्यामुळे कुणी काही बोलू शकत नाही कारण मी पुराव्यानिशी सर्व दिले आहे. कंत्राटी कामगारांचे सर्व षडयंत्र मागच्या सरकारच्या काळात झाले आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग येथे श्रीक्षेत्र नाणिज या ठिकाणी स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या सुंदरगडावर जन्मोत्सव सोहळ्याला राहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प्रसाद घेतला व आरतीही केली. यावेळी त्यांनी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांना जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करून आशीर्वाद घेतले.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी फडणवीस म्हणाले की, कंत्राटी कामगारांचे सगळं षडयंत्र मागच्या सरकारच्या काळात झाले. त्यामुळे विरोधात आता जाणीवपूर्वक आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून राज्यभर भाजपकडून आंदोलने करण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजपकडून त्यांना उघड करण्याचे आंदोलन होणार आहे. वड्डेट्टीवर यांनी केलेले वक्तव्यावर फडणवीस म्हणाले की, वड्डेट्टीवार हे त्यांनाच माहीत नाही ते काय बोलत आहेत. जेवढा काळ विरोध अधिवेशन चालवतील तेवढे आम्ही चालवू, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.