केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अमित शहा यांची सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहेत. विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक देखील घेणार आहेत. त्यामुळे अमित शाह आज या सभांमध्ये काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. भाजप आणि महायुतीचे नेते या सभेला उपस्थित असणार आहेत.
विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह मंगळवारी अकोल्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. दुपारी 1 वाजता बैठक आटोपून ते जळगावच्या सभेसाठी रवाना होणार आहे. जळगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार असून, सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची दुसरी सभा होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री संदिपान भुमरे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, पंकजा मुंडे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि आमदार या सभेला हजर असतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे काल संध्याकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.अमित शाह यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर 186 अधिकारी आणि 1800 पोलिसांसह एस.आर.पी.एफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
