विधानसभेला वरळी राखणं आदित्य ठाकरेंसाठी सोपं नाही; वरळीत भाजपची बॅनरबाजी

दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाले. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानाव लागलं. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुंबईत तसेच राज्यात काही मतदारसंघात सेना विरुद्ध सेना असा सामना होता. मुंबईत मविआने चार तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. मुंबई हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईची जागा ठाकरे गटाने जिकंली. फक्त उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी निवडून आले. मुंबईत तीन जागा जिंकून ठाकरे गटाने आपल वर्चस्व अबाधित राखल असलं तरी वरळीतल मताधिक्क्य चिंता वाढवणार आहे.

आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपची बॅनरबाजी पाहयला मिळतेय. वरळीकरांचे लाख लाख आभार असे बॅनर पाहायला मिळत आहेत. वरळीमध्ये घटलेल्या मतांवरुन भाजपने ठाकरेंना डिवचलं आहे. तर वरळी मतदारसंघात आमदार आहेत आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपने ही बॅनरबाजी केलेली आहे. तर वरळीकरांचे लाख लाख आभार असे बॅनर लावण्यात आलेले आहे. भाजपसेनेमध्ये नेमके कोणाला किती मतं होती, कोणी लिड घेतलेली होती त्याचा आकडा सुद्धा देण्यात आलेला आहे. वरळीमध्ये हे बॅनर लागलेले आहेत ज्या ठिकाणी अरविंद सावंत लोकसभेमध्ये उतरलेले होते. ते जरी जिंकून आले असतील तरी वरळी मतदारसंघामध्ये त्यांची कुठेतरी मतमोजणीच्या वेळी पिछेआड झाली होती.

वरळीमधून यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांना 64 हजार मतं पडली, तर भाजप सेनेच्या यामिनी जाधव यांना 58 हजार मतं मिळाली. अरविंद सावंत यांना वरळीतून फक्त 6,715 मतांचा लीड मिळालं. वरळी कोळीवाडा हेमांगी वरळीकरच्या 193 वॉर्डमध्ये 598 मतांनी मागे आणि किशोरी पेडणेकर 199 वॉर्डमध्ये 541 मतांनी अरविंद सावंत मागे पडले. सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार करताना ठाकरे गटाला ही चिंतेत टाकणारी बाब आहे. भाजपाने जे बॅनर लावलेत, त्यावर लोकसभेची कसर विधानसभेला भरुन काढू असं लिहिलय. या बॅनरवरुन भाजपा वरळीचा गड सर करण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरणार हे स्पष्ट आहे.