संजय राऊत यांची राज ठाकरेंवर वरताण , गटारगंगा म्हणत पवित्र महाकुंभ स्नानावर टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा नदी आणि महाकुंभ वर टीका करताना भावना दुखावल्या आहेत. महाकुंभातील पवित्र स्थानावर टीका करताना गंगेला ते गटारगंगा म्हणाले. (Sanjay Raut criticizes holy bath in Mahakumbh, calling it a sewer)

राज्यात सध्या पीओपी मूर्तीच्या बंदीवरून वातावरण तापविण्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या  निर्देशांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लागू करण्यात आला.  न्यायालयाने यापूर्वीही राज्य सरकारला वेळोवेळी मुदत दिली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देऊन पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  गणेश  मूर्तिकार बेरोजगार होऊ नयेत आणि पारंपरिक मूर्ती निर्मितीवर परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना  सुरु केल्या आहेत. डॉ.अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे.  वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून पीओपी मूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भातील अभ्यास करत आहे. मात्र बंदीचे खापर सरकारच्या डोक्यावर फोडण्याचा विरोधकांचा डाव आहे.
यावरूनच राऊत  यांनी  पीओपीच्या मुर्तींवरती बंदी आणलेली आहे, हे कसलं हिंदुत्व ?” असा सवाल केला. वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधन आणताय. आमच्या राज्यात हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगता होता, मग आता काय झालं? असेही विचारले. मात्र यावेळी त्यांनी कोट्यवधी भारतीयांच्या भावनाही दुखावणारे वक्तव्य केले. ते म्हणाले, पर्यावरणाची इतकी काळजी आहे, मग गढूळ पाण्यात महाकुभंमध्ये का स्नान करायला लावलं?. राष्ट्रीय हरीत लवादाचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेत कोट्यवधी लोकांना का डुबकी मारायला लावली?
कुंभमेळ्या संदर्भात राज ठाकरे यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की ,  आमचे बाळा नांदगावकर महाकुंभला गेले होते. ते कमंडलूमधून पाणी घेऊन आले. मी म्हटलं हड मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावर व्हिडीओ पाहतोय तिथे आलेल्या बाया, पुरुष अंग घासतायत. आणि बाळा नांदगावकर म्हणतात साहेब हे गंगेचं पाणी घ्या, कोण पिणार ते पाणी?
राज ठाकरे यांच्या वरताण असे  संजय राऊत यांचे गटारगंगा हे वक्तव्य आहे. त्यावरून त्यांच्यावर संताप व्यक्त होऊ लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *