लोकल ट्रेनमध्ये बॅग घेऊन दरवाज्यात उभे राहण्यास मनाई

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई लोकल मधून आता प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल ट्रेनच्या दरवाज्यात बॅग घेऊन उभं राहता येणार नाही. रेल्वे सुरक्षा बल आणि लोकमार्ग पोलीस यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावलं उचलली आहेत. मुंब्रा दिव्यादरम्यान झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे. ( Standing at the door with bags prohibited in local trains)

लोकल ट्रेनच्या दरवाज्यात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी चार प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा बल आणि लोकमार्ग पोलीस यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावलं उचलली आहेत. संध्याकाळच्या पीक अवर्सला मुख्य स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त जवान तैनात केले जाणार आहेत. लोकल ट्रेनच्या दरवाजामध्ये बॅग घेऊन उभे राहण्यासाठी आता बंदी घालण्यात आलेली आहे.

काही दिवसांपूर्वी चालत्या ट्रेनमधून पडून चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातामागे बॅग घासण्याचे कारण देण्यात आले होते. त्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर लोकांच्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा आणि महामार्ग पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. बॅगधारक प्रवाशांनी लोकलच्या दरवाजामध्ये उभा राहू नये याची खबरदारी घेण्यासाठी संध्याकाळच्या वेळी गर्दी असताना मुख्य स्थानकात प्लॅटफॉर्मवरती अतिरिक्त जवान तैनात केले जाणार आहेत.

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेमार्गावरील दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. दोन लोकल ट्रेन आजुबाजूने जास्त असताना या ट्रेन्सच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्यामुळे आठ जण रेल्वे ट्रॅकवर पडले होते. मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान एक लोकल ट्रेन कसाऱ्याच्या दिशेने आणि दुसरी सीएसएमटीला जात होती. या दोन्ही लोकल ट्रेन आजुबाजूच्या ट्रॅकवरुन जात होत्या. या दोन्ही ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवासी फुटबोर्डवर उभे होते. यापैकी काही प्रवाशांच्या खांद्याला बॅगा लावल्या होत्या. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी ट्रेनमधून बाहेर आले होते. या दोन्ही लोकल ट्रेन एकमेकांच्या बाजूने जात असताना त्या वेगात होत्या. यावेळी काही प्रवाशांच्या बॅगचा धक्का दुसऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांना लागला आणि फुटबोर्डवर काही इंच अंतरात पाय ठेवून उभे असलेले प्रवासी ट्रेनमधून खाली पडले.

नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल. सध्याच्या लोकल ट्रेन्सनाही ऑटोमेटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल. कल्याण कसारापर्यंत तिसरी आणि चौथी लाईन तर कुर्लापर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार
सरकारी आणि खासगी कार्यालयांनी एकच ऑफिस टाईम न ठेवता वेगवेगळे इन-आऊट टाईम ठेवावे, असे निर्णयही घेण्यात आले आहेत.