विशेष प्रतिनिधी
मुंबई : विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात राजकीय पोळी भाजून घेत श्रेय लागण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांना 20 टक्के वाढीव पगार देण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे. ( Attempts to divert credit from Pawar – Thackeray but the Chief Minister took a decision and gave relief to the teachers)
विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा होईल, असे आश्वासन सरकारनं दिलं आहे. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली. इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिलं. त्याआधी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचे महाजन यांनी सांगितले.
राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना देण्यात आलेल्या आश्वासन सरकारने पूर्ण करावे, शाळांना 20 टक्के टप्प्याटप्याने अनुदान यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं होते. सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आझाद मैदानात जाऊन शिक्षकांची भेट घेतली होती. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते.
मुख्यमंत्र्यांचा निरोप शिक्षकांना देतानागिरीश महाजन म्हणाले की, 18 तारखेला पावसाळी अधिवेशन संपेल. त्यावेळी तुमच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा झालेला असेल. मुख्यमंत्री हे शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्षकांसबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र थोड्या आर्थिक अडचणींमुळे मधल्या काही काळातील हफ्ते देण्यास उशीर झाला. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुणावरही विश्वास ठेऊ नका, तुमचे काम आम्हीच करणार आहोत. पुरवणी मागण्यांमधे आज मांडता आले नाही, मात्र इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही. इथून पुढे हा पगार नियमितपणे तुमच्या खात्यात जमा होईल.
