विशेष प्रतिनिधी
पुणे: संशयास्पद लक्झरी डील्समुळे चर्चेत असलेल्या करण आणि सौम्या बोथरा या दाम्पत्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
( Punes Fraud CoupleLand in Trouble Again Karan and Saumya Bothara face yet another cheating case as Ludhiana police step in to seek custody)
लुधियानाच्या एका मद्याच्या व्यापाऱ्याची त्यांनी दोन कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे. लेक्सस (Lexus) कार विक्रीच्या बहाण्याने बोथरा दाम्पत्याने लुधियाना येथील लवतर सिंग बजाज यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या लेक्सस या अल्ट्रा-लक्झरी मिनिव्हॅनसाठी २.४५ कोटी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. करण आणि सौम्या यांनी गाडी ताब्यात घेतली आणि नंतर ते गायब झाले. पुणे पोलिसांनी त्यांना यापूर्वीच फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. लुधियाना पोलिसांनी बोथरा दाम्पत्याला ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
