उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर असून सोमवारी पहाटे नरिता आंतरराष्ट्रीय विमानतळावर जपान मधील मराठी बांधवांनी त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले.फडणवीस यांचे भारतीय प्रमाण वेळेनुसार आज पहाटे पाच वाजता जपानमध्ये आगमन झाले. यावेळी मराठी बांधवांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
जपान दौर्याच्या पहिल्याच दिवशी विमानतळावर उतरल्याबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडले. जपानमध्ये भारतीयांनी विमानतळावर माझे जंगी स्वागत केले. ज्याप्रमाणे माझे कुटुंबीय माझे औक्षण करतात अगदी तसेच स्वागत माझे जपानमध्ये झाले. भारतीयांनी गायलेले ‘लाभले आम्हास भाग्य’ या गीताने जपान अगदी महाराष्ट्रमय झाल्यासारखे वाटले. खरंच जपानमध्ये आल्यानंतर आपली संस्कृती आणि महाराष्ट्रावरचे प्रेम, आपले भारतीय किंचितही विसरले नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
