परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीत महाराष्ट्रात 36 हजार 634 कोटींची परदेशी गुंतवणूक आली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देखील सर्वाधिक एफडीआय अर्थात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली. याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, आनंदाची बातमी !2022-23 या आर्थिक वर्षांत ₹1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे. डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ₹36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. महाराष्ट्राला गुंतवणुकीत पहिल्या स्थानावर आणले आहे.महाराष्ट्रला 2019 पर्यंत पहिल्या स्थानावर ठेवलं होतं. पण उद्धव ठाकरेचे सरकार आल्यानं महाराष्ट्र यादीतून बराच खाली जाऊन गुजरात पहिला क्रमांकावर गेले. मागील एका वर्षात महाराष्ट्रला गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणलं आता तिमाही रिझल्ट आले आहे. जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमुळे फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट जरी कमी झाली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सत्तेत आल्यावर आम्ही घोषणा केली होती. महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणू ते पूर्ण झालं आहे.

देशात गेल्या साडेतीन वर्षांत राज्यात सुमारे चार लाख कोटींची विदेशी गुंतवणूक आली आहे. देशभरातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 29 टक्के आहे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीत महाराष्ट्रात 36 हजार 634 कोटींची परदेशी गुंतवणूक आली आली आहे. देशभरातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 29 टक्के आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1 लाख 18 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. देशात राज्याचा पहिला क्रमांक आहे.

● 2022-23 या आर्थिक वर्षांत ₹1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे.

●डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ₹36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.

● दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे.*
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरू आहे आणि गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मनापासून अभिनंदन!!

● याचा अर्थ विकसित देशातल्या बड्या आणि मध्यम गुंतवणूकदारांना भारतातले महाराष्ट्र हेच राज्य सुरक्षित आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वाटत आहे. मात्र या सकारात्मक चित्राकडे विरोधकांनी दुर्लक्ष करणे स्वाभाविक मानता येईल. पण माध्यमांनीही त्याकडे दुर्लक्ष करणे हे मात्र निश्चितच अस्वाभाविक आहे. त्याची कारणे त्यांच्या “विशिष्ट बुद्धीत” दडली आहेत.