पंतप्रधानांनी साजरे केले आगळे वेगळे रक्षाबंधन

आज रक्षाबंधनाचा दिवस. एक अतिशय खास असा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या दिवसाच्या निमित्ताने आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला. आज पंतप्रधान मोदी यांनी पीएमओ मध्ये कार्यरत ज्युनियर कर्मचाऱ्यांच्या मुलींसोबत हा सण साजरा केला. या लहान लहान मुलींनी त्यांना रक्षासूत्र बांधले आणि अशा पद्धतीने एक अतिशय वेगळा असा कार्यक्रम पार पडला.


या कार्यक्रमाचे व्हिडियोज आणि फोडोज पंतप्रधानांनी शेअर केले आहेत. एक सुरेख कार्यक्रम, आगळा वेगळा कार्यक्रम साजरा करण्यात आला. चिमुरड्या मुलींना पंतप्रधानांना भेटायची प्रचंड उत्सुकता होती आणि आनंद देखील. यातील एक मुलगी म्हणते “मी पंतप्रधान मोदींना भेटायला उत्सुक होते आणि नर्व्हस देखील. मात्र जेंव्हा मी पीएम सरांना भेटले आणि त्यांचे बोलणे ऐकले, मला खूप आनंद झाला.”



एक मुलगी म्हणाली, “सरांनी आम्हाला खूप प्रेरणा दिली, आम्हाला असे वाटत होते, जसे आम्ही त्यांच्या घरचेच आहोत.” आपलेपणाच्या भावनेने आयोजित केलेला हा कार्यक्रम ज्यात कुठल्याही प्रकारचा गाजा वाजा नव्हता.

सगळ्यात ज्युनिअर असलेल्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांनी दिलेला हा सन्मान आहे. आणि यातून प्रत्येकानेच प्रेरणा घ्यायला हवी.