गोळीबाराची घटना गंभीर; मात्र त्याच राजकारण करणं योग्य नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तर, विरोधकांनी या प्रकरणात सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, या घटनेला राजकीय रंग देणे चुकीचे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोळीबाराची घटना गंभीर आहे. मात्र त्याच राजकारण करणं योग्य नाही. या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्था संपलेली आहे, असं म्हणण चुकीच आहे. कारण ही हत्या व्यक्तीगत वैमनस्यातून घडली आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “बंदुकांचे लायसन्स असतील, ही लायसन्स देताना काय खबरदारी घेतली पाहिजे? याचा विचार सरकार नक्कीच करेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

घोसाळकर आणि मॉरिस काही वर्षे एकत्र काम करत होते. आपापसातील वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आले आहे. माझ्यावर पूर्णपणे राजकीय आरोप आहेत.एखाद्या गाडी खाली एकदा श्वान आला तर ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असा टोला विरोधकरांना फडणवीसांनी लगावला. विरोधीपक्षाचे काम विरोधीपक्ष करतोय. पण या घटनेचे कुणी राजकारण करू नये, असा सल्लाही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिला.