शक्ती कायद्याचा आढावा  घेऊन  नवीन दुरुस्तीसह पुढची कारवाई , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी
मुंबई : शक्ती कायदा  अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा  होता. सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयावर अधिक्षेप होत होता, असा आक्षेप केंद्रीय गृह विभागाने घेतला होता.  शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या, त्या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा त्याचा आढावा घेऊ आणि नवीन दुरुस्तीसह पुढची कारवाई करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Further action with new amendment after review of Shakti Act, assurance of Chief Minister Devendra Fadnavis)
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करता यावी, यासाठी प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी ‘महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट – 2020’ कायदा करण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शक्ती कायदा जो तयार केला होता, तो कायदा अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता. केंद्रीय गृह विभागाने जो आक्षेप घेतला होता, त्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयावर अधिक्षेप होत होता. हा अधिकार राज्याला नाही. म्हणून काही बदल करणं अपेक्षित होते. पण त्याआधी केंद्र सरकारने काही नवीन कायदे केले. आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या, त्या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा त्याचा आढावा घेऊ आणि नवीन दुरुस्तीसह पुढची कारवाई करु.
पुण्यातील  स्वारगेट बलात्कार   प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला आज मध्यरात्री अटक झाली आहे. या संदर्भात  मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज बोलले. “आरोपीला अटक झाली आहे. तो लपून बसला होता. त्याला पोलिसांनी वेगवेगळ्या टेक्नोलॉजीचा वापर करुन शोधून काढलं. लवकरया या घटनेचा पदार्फाश होईल. त्या संदर्भात पोलीस कमिशनरनी काही माहिती दिली. या स्टेजला जास्त माहिती देणं योग्य नाही. योग्य स्टेज आल्यावर आपल्याला नेमका घटनाक्रम काय आहे? त्याची सगळी माहिती देऊ.
बलात्कार पीडितेने प्रतिकार केला नाही असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले होते. त्यावरून विरोधकांनी संताप व्यक्त करत कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, योगेश कदम जे बोलले ते वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते, माझा स्वत:चा समज असा आहे की, ते सांगण्याचा प्रयत्न करत होते, की हा गर्दीचा भाग आहे. बस आत नव्हती, बाहेर होती. पण लोकांना प्रतिकार होताना लक्षात आलं नाही, असं त्यांचा सांगण्याचा प्रयत्न होता. तथापी ते नवीन आहेत, तरुण मंत्री आहेत. काहीतरी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की, मी त्यांना सल्ला देईन की, अशा प्रकरणात बोलताना जास्त संवेदनशील असंल पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाली, तर समाज मनावर वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. मंत्री, लोकप्रतिनिधींनी अशा घटनांबद्दल बोलताना संवेदनशी असलं पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *