सुषमा अंधारे यांना उर्फी जावेदचं येवढं कौतुक का?

उर्फी जावेद ही समाज माध्यमांद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आली परंतु तिच्या तोडके कपडे घालण्याच्या पद्धतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली पण ती समाज माध्यमांवरच अशातच उर्फी जावेदच्या एका व्हिडिओ वर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी सर्व सामान्य लोकांच्या समोर असे वर्तन करणे योग्य नाही. या संदर्भात चित्रा वाघ यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. कोणी कसे कपडे घालावे यावर कुणाचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. परंतु तुम्ही जेंव्हा सार्वजनिक जीवनात वावरता तेंव्हा तुम्ही भान राखण गरजेचं आहे.

    यावर मात्र, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आता उडी घेतलीये. त्यांनी देखील समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहिली. मी साडी घालते व ड्रेस घालते त्यात मला काही अडचण कुणी काय घालावे व काय नाही यावर कुणी कुणाला सक्तीही करू शकत नाही. अंधारे यांचं मत देखील योग्यच आहे ज्यांना जे कपडे परिधान करायचे आहेत ते करू शकतात मग ती स्त्री असो कि पुरुष. महिलांनी कसे कपडे घालावेत हा मुद्दाच नाही उर्फी जावेदने देखील कसे कपडे घालावेत हा तिचा प्रश्न आहे अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली. 

यावर अंधारे यांनी कंगना राणावत, केतकी चितळे त्यांच्यावर का आक्षेप घेत नाहीत यावर त्यांचे काही फोटो दाखून अंधारे यांनी यावर का आक्षेप घेतला जात जात नाही यावर सुषमा अंधारे बोलल्या. परंतु व्यावसायिक दृष्ट्या त्या ते कपडे परिधान करतात सार्वजनिक जीवनात त्या तशा वागत नाहीत त्यात कोणतीही अश्लीलता नसते. उर्फी जावेद मात्र सार्वजनिक ठिकाणी कमी कपड्यात वावरते यामुळे लहान मुलांच्या प्रौढ व्यक्ती व महिलांना लाज निर्माण होईल अशी वागणूक उर्फी जावेदची असते. यावर चित्रा वाघ यांच्या आक्षेप घेतला तर सुषमा अंधारे यांना वाईट वाटण्यासारखं व उर्फी जावेद च कौतुक वाटण्यासारखं काय आहे? सुषमा अंधारे यांनी टेनिस व स्विमिंग महिला खेळाडूंच्या कपड्यांचे उदाहरण अंधारे यांनी दिले परंतु त्या खेळाची ती गरज असून त्यासाठी त्या खेळाडु तसे कपडे घालतात. 

उर्फी जावेद ही काही खेळाडू नाही त्यामुळे तिला सार्वजनिक ठिकाणी कसे वावरावे त्याच भान पाहिजे. तोच मुद्दा सुषमा अंधारे यांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्यात पण ह्या अंधारे यांनी राजकारण केले ती अल्पसंख्यांक आहे तिला मारण्याची धमकी दिली जात आहे. अशा प्रकारचे वक्तव्य सुषमा अंधारे करत आहेत अंधारे यांना उर्फीच एवढं कौतुक का आहे हे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट करावे.