राज्य सरकार आपल्या नागरिकांचा विचार कधी करणार ?

राज्यात कोरोना ने कहर केलाय. राज्याच्या जनतेसमोर आज खूप मोठे प्रश्न उभे आहेत. जनता जीव मुठीत धरून उभी आहे, आपल्या जनतेचा रोजगार गेलाय, आपले बारा बलूतेदार आज रोजगारासाठी वणवण फिरताएत, मात्र राज्यातील छोट्या घटकांकडे सरकारचे लक्ष नाही, राज्य सरकार आपल्या नागरिकांचा विचार कधी करणार ? असा प्रश्न आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या आजच्या सत्रात ते बोलत होते. कोरोनामध्ये महाराष्ट्रात मृत्यूचे थैमान चालू आहे. अनेक शहरांमध्ये अतिशय भयावह स्थिती आहे. महाराष्ट्र अनेक क्षेत्रात नंबर 1. आहे पण, तो कोरोनात नंबर एक होऊ नये, अशी आमची अपेक्षा होती. असेही ते म्हणाले होते.

यावेळी राज्यातील विविध शहरांची अवस्था सांगत ते म्हणाले कि, “मी वेगवेगळ्या महानगर पालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये, जिल्ह्यांमध्ये गेलो, फर्स्टहँड इन्फर्मेशन घेतली, सगळीकडे मी डॉक्टर्स सोबत चर्चा देखील केली, अतिशय भयानक अवस्था आहे. या महाराष्ट्रात मुंबई महत्वाचंच आहे, पुणे देखील महत्वाचं आहे, मात्र औरंगाबाद, नाशिक नागपूर हे या महाराष्ट्रात नाही का? त्यांचा वाली कोण?” असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणले कि, “मुख्यमंत्री महोदय मुंबईकडे लक्ष देणार, उपमुख्यमंत्री पुण्याकडे लक्ष देणार, मग मराठवाडा विदर्भ या राज्यांकडे तेथील जनतेकडे कोण लक्ष देणार? कोरोनाचे विविध हॉटस्पॉट्स तयार झाले आहेत, त्या हॉटस्पॉट्सचे तुम्ही काय केलं? या शहरांना किती पैसे देण्यात आले?” असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार वर हल्ला बोल करत म्हटले कि, “आम्हाला मान्य आहे कि सरकार समोर पण आर्थिक अडचणी असतील मात्र मग अशावेळी अतिशय आवश्यक गोष्टींसाठीच सरकारने खर्च करावा इतर खर्च टाळून केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठी खर्च सरकारने करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

कोविड सेंटर्स वर जर महिला सुरक्षित नसतील तर महिलांनी काय करावं?

यावेळी कोविड सेंटर्सची भयानक परिस्थिती सांगत ते म्हणाले कि, कोविड सेंटर्स मध्ये महिलांसोबत अत्याचार होताएत, बलात्कार होताएत, जरका राज्याच्या कोविड सेंटर्समध्ये महिला सुरक्षित नसतील तर मग महिलांनी कुठे जायचं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मुंबई पोलिसांची क्षमता मला माहीत आहे :

मुंबई पोलिसांची क्षमता मला माहीत आहे, मी ५ वर्षे त्यांच्या सोबत गृहमंत्री म्हणून काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या कामाविषयी मला कल्पना आहे, मात्र अनेकदा राज्य सरकारचा दबाव त्यांच्यावर दिसून येत आहे. भूमिका बदलली ती आपण कसे बदलतो याचे उदाहरण आपण इथे बघू शकतो, असे म्हणत त्यांनी सत्ता पक्षावर निशाणा साधला.

आरे कारशेडची जागा बदलण्याविषयी ते म्हणाले कि, “राज्य अहंकारासाठी, इगोसाठी चालवायचं नसतं, ते जनतेसाठी चालवायचं असतं. आरेची जागा सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन ट्रिब्युनल ने मान्यता दिली, त्याठीकाणी काम सुद्धा सुरु झालं होतं, डेपोचं सिव्हिल वर्क ३०% पूर्ण झालं होतं, बाउंड्री वॉल, अंडरपास सगळं तयार झालं होतं. आता याचा वाया गेलेला पैसा कोण देणार?” असेही ते यावेळी म्हणाले.

कोविड पासून ते आरे कार शेड, पालघर येथे साधूंच्या हत्येचे प्रकरण, अशा सर्व विषयांवर त्यांनी आज सरकारला खडे बोल सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *