दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून या सोहळ्यात ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘द कश्मीर फाइल्स हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला असला तरी आजही हा सिनेमा चर्चेत आहे. नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला असून या सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार सर्व दहशतवाद पीडितांना आणि देशातील लोकांना समर्पित केला.
या सोहळ्यात अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यात गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामधील भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.या सोहळ्यासाठी अभिनेत्री रेखा हिने देखिल उपस्थिती लावली होती. आलिया आणि रेखाचा या कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सोहळ्यात आलिया भट्टने हजेरी लावली होती. रणबीर कपूर आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईबाहेर होता. त्यामुळे त्याने या सोहळ्यास उपस्थिती लावली नाही.
दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सोहळ्यात रेखा, आलिया भट्ट, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर. बाल्कीसह अनेक सेलिब्रिंटींनी हजेरी लावली होती. मात्र सर्वाधिक लक्ष वेधले ते रेखा आणि आलियाने. पुरस्कार सोहळ्यात आलियाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तर रेखा यांनी सोनेरी रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती.
