ठाकरे गटाने आमचे मशाल चिन्ह चाेरले; समता पार्टीची सर्वाेच्च न्यायालयात धाव

उद्धव ठाकरे गटाने आमचे  मशाल चिन्ह चाेरल्याचा आराेप समता पार्टीने केला आहे. मशाल चिन्हावर दावा करत समता पार्टीच्या  वतीने  थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ म्हणाले मशाल चिन्ह समता पार्टीचे आहे.ते आधीही होतं आणि आता इथून पुढे देखील राहील. जे आता मशाल मशाल करत आहेत ती समता पार्टीचे मशाल आहे ती त्यांची नाही. उद्धव ठाकरे गट चोर आहे. त्यांनी आमचं मशाल चिन्ह चोरी केले.  शिवसेनेतील अंतर्गत वादावर आता तोडगा निघाला आहे शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले  त्यामुळे मशाल चिन्ह हे समता पार्टीचे आहे ते आम्हाला मिळावं यासाठी  याचिका दाखल केली आहे.