कसोटी ‘चॅम्‍पियनशीप’ फायनलमध्‍ये भारतीय संघाची धडक

न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या कसोटी मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे. यामुळे आता कसोटी क्रिकेट चॅम्‍पियनशीपच्‍या फायलनमध्‍ये पोहचण्‍याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे.

पराभवामुळे श्रीलंकेचे चॅम्‍पियनशीपच्‍या फायलनमध्‍ये पोहचण्‍याचे स्‍वप्‍न धुळीस मिळाले आहे जाणून घेवूया नव्‍या समीकरणाविषयी…
गुणतालिकेत अग्रस्‍थानी असणारा ऑस्‍ट्रेलियाचा संघ कसोटी क्रिकेट चॅम्‍पियनशीप फायनलमध्‍ये यापूर्वीच पोहचला आहे. भारत दुसर्‍या तर श्रीलंका तिसर्‍या स्‍थानी होते. श्रीलंकेला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागणार होते. तर भारताला अहमदाबाद येथे सुरु असलेल्‍या ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध च्‍या चौथ्‍या कसोटीत विजय मिळवणे अनिवार्य होते. भारत- ऑस्‍ट्रेलियामधील चौथ्‍या कसोटी सामन्‍याच्‍या निकाला आधीच श्रीलंकेचा मालिकेतील पहिल्‍याच सामन्‍यात पराभव झाला आहे. त्‍यामुळे आता भारताचे गुणतालिकेतील दुसरे स्‍थान अबाधित राहिले आहे. त्‍यामुळे कसोटी क्रिकेट चॅम्‍पियनशीपच्‍या फायलनमध्‍ये भारताने धडक मारल्‍याचे स्‍पष्‍ट झाले असून, कसोटी क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात सलग दुसर्‍यांदा टीम इंडिया पोहचली आहे.