आयारामांच्या भरवश्यावर ठाकरे यांची शिवसेना; शीतल म्हात्रे यांनी दिली यादी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाला राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस पक्षाच्या दावणीतून सोडण्यासाठी उठाव केला. त्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. एका गटाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत तर शिवसेना पक्षाच नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलेलं आहे. शिंदे यांनी उठाव केल्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकारी, नेते आणि मूळ शिवसैनिकांची शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. ठाकरे गटात अजूनही काही मातब्बर नेते आहेत. पण ते सर्व इतर पक्षातून आलेले आयाराम आहेत. अशा आयारामांच्या भवरश्यावरच उद्धव ठाकरे आपला पक्ष पुढे नेताना दिसत आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटातील या आयारामांची एक यादीच दिली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ठाकरे गटातील आयारामांची यादी दिली आहे. कोण कोणत्या पक्षातून ठाकरे गटात आलाय आणि सध्या त्यांच्याकडे काय जबाबादारी आहे याची माहितीच शीतल म्हात्रे यांनी दिली आहे.

ठाकरे गटाचे निष्ठावंत सैनिक… शीतल म्हात्रेंनी दिलेली यादी
सचिन अहिर- राष्ट्रवादी

सुषमा अंधारे – राष्ट्रवादी

भास्कर जाधव – राष्ट्रवादी

वैभव नाईक – काँग्रेस

मनिषा कायंदे – भाजप

प्रियंका चतुर्वेदी – काँग्रेस

संजना घाडी – मनसे

राहुल कानाल – काँग्रेस

साईनाथ दुर्गे – मनसे

ही यादी दिल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी अजून कोण उरलंय? असा सवालही केला आहे.