वज्रमूठ एकमेकांवरच वापरायची वेळ येऊ नये, विखे पाटलांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

आज बांधलेली वज्रमूठ त्यांना एकमेकांवरच वापरायची वेळ येऊ नये अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सभेवर पुण्यात बोलताना केली आहे.

विखे पाटील म्हणाले, अडीच वर्ष घरात बसले. लोकांनी त्यांना फक्त फेसबूक वर पाहिलं आणि आता वज्र मूठ बांधली याचा काय उपयोग? त्यासोबतच उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहात येऊ नये. ठाकरेंच्या हातात आता काहीच राहिले नसून रिमोट कंट्रोल कुणीतरी वेगळाच आहे.अजित पवारांनी सावरकर यांच्या वरून केलेल्या टीकेला देखील विखे पाटलांनी जोरदार उत्तर दिल आहे. सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतचा ठराव झाला असून केंद्र सरकार त्यावर लवकरच निर्णय घेईल. पण अजित पवारांनी यावर बोलू नये. अजित पवारांची टीका किती मनावर घ्यायची असा सवाल देखील विखे पाटलांनी केला आहे.बागेश्वर महाराज भ्रमिष्ट झाले असून त्यांच्या विधानाचा निषेध करतो.अशा महाराजांवर कारवाई केलीच पाहिजे अशी मागणी देखील विखे पाटील यांनी केली.