
देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. ही वाढ खूप अधिक जरी नसली तरी याची दखल घेण्यासारखी आहे. आज देशभरात कोरोनाचे ४५ हजार नवीन रुग्ण सापडले आहेत. आणि ही चिंतेची बाब आहे, कारण पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढणार का? आणि कोरोनाची तिसरी लाट येणार का ? असे प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या मनात यायला लागले आहेत. महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यात अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण दिसून येत आहेत, त्यामु ळे आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आकडे बघता, महाराष्ट्रात अजूनही १,१४,६२५ एक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात आज ९५५८ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ८८९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. म्हणजेच राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ आहे. आणि ही चिंतेची बाब आहे.
आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. ७ जुलैपर्यंत देशभरात ३६ कोटी ४८ लाख कोरोना वक्सिनचे डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात ३३ लाख ८१ हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास ४२ कोटी ५२ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हे सर्व आकडे एवढच सांगताएत कि धोका अजूनही टळलेला नाही. लसीकरण जरी झाले असले तरी त्याचा अर्थ असा नाही कि आपण कुठलीही काळजी न घेता बाहेर पडावं, मरीन ड्राईव्ह सारख्या प्रसिद्ध ठिकाणांवर जाऊन गर्दी करावी. अजूनही आपण मोठ्या प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे. आता काळजी घेतली तरच कोरोनाची तिसरी लाट टाळता येईल. मात्र तसे न केल्यास त्याचे कठीण परिणाम भोगावे लागतील हे मात्र खरं.
