लखनऊ की पंजाब कोणाचं पारडं जड; मोहालीमध्ये रंगणार सामना

इंडियन प्रिमियर लीगच्या 16 व्या हंगामातील 38 व्या सामन्यात लखनऊ आणि पंजाबचा संघ एकमेकांना भिडणार आहे. पंजाबच्या आय एस बिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलच्या या हंगामात दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. गेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने जबरदस्त पुनरागमन करत मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे या सामन्यातही पंजाबचा उत्साह कायम असणार आहे. दुसरीकडे लखनऊच्या संघाला गेल्या सामन्यात गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात लखनऊला विजयाची आवश्यकता आहे.

पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ २ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ सामन्यात विजय मिळवला आहे.तर आयपीएलच्या गुणतालिकेत लखनऊचा संघ चौथ्या तर पंजाबचा संघ सहाव्या स्थानी आहे.

पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांसाठी सारखीच आहे. इथली खेळपट्टी पूर्वी गोलंदाजांसाठी अनुकूल होती, पण आता ती फलंदाजांनाही अनुकूल झाली आहे. येथे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये स्विंग आणि बाऊन्सची खूप मदत मिळते. जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी फलंदाजांना मदत करू लागते.

दोन्ही संघातील पॉसिबल प्लेइंग-11

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंह, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, सॅम करन, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग/नाथन एलिस.

लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, आवेश खान आणि रवी बिश्नोई.