बारसुतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित

बारसुतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. या कालावधीमध्ये सरकारसोबत चर्चा होणार आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सरकारच्या वेगवेगळ्या आश्वासनांनंतर देखील माती परिक्षण थांबवण्यावर आंदोलक ठाम आहेत. मात्र आता आंदोलकांनी काही काळ आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन दिवसांमध्ये माती सर्वेक्षण थांबलं नाही तर पुन्हा आंदोलन सुरु करु, असा इशारा देण्यात आलेला आहे. आंदोलक काशिनाथ गोरले यांनी याबाबत माहिती दिली. आंदोलनकर्त्यामध्ये एकवाक्यता झाली असून पुढचे तीन दिवस आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. यादरम्यान चर्चा करुन तोडगा काढण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे. यासंदर्भातील वृत्त माध्यमांनी दिले आहे.