
महाराष्ट्र राज्य राजकारणाच्या दृष्टीने सदैव चर्चेच असलेलं राज्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दर दिवशी काही ना काही घडत असतं. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय सक्षम असा विरोधी पक्ष आणि तीन पक्ष मिळून एकत्र आलेलं आघाडी सरकार. तर याच सरकराच्या सध्याच्या घडामोडींविषयी पत्रकारांद्वारे आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न करण्यात आले, त्यावेळी “आघाडी सरकार हे सूडाचे राजकारण करत आहे, आणि संपूर्ण महाराष्ट्र ते उघड्या डोळ्यांनी बघत आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले.
पत्रकारांद्वारे, राणेंच्या बंल्यावर आता महापालिकेचे कर्मचारी कारवाई साठी पोहोचले आहेत, त्याबाबत आपल्याला काय म्हणायचं आहे, असा प्रश्न विचारल्या असता ते म्हणाले कि, “ जे काही सूडाचं राजकारण सरकारला करायचं असेल, ते सरकार करेल, मात्र न्यायालय आहे, ते यासंबंधात योग्य ते निर्णय घेईल. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलावर काय कारवाई झाली, याकडे सगळे उघड्या डोळ्यानी बघत आहेत. किरीट सोमैय्या यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सर्व सरकारच्या निराशेमुळे आहे. जी निराशा स्वत:बद्दल या सरकारला आहे, ती या सूडाच्या राजकारणातून बाहेर पहते आहे.” असे मत फडणवीस यांनी यावेळी नोंदवले.”
किरीट सोमैय्या यांनी सरकार मधील मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांच्या बेनामी संपत्ती, आणि बंगल्यांविषयी अनेक कागदपत्र आता पर्यंत प्रस्तुत केले आहे, यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा देखील समावेश आहे. आणि त्याविरोधात त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला. ही घटना भरपूर गाजली. त्या अनुशंगाने पत्रकारांद्वारे विचारलेल्या प्रश्नांना फडणवीस यांनी उत्तर दिले.
तसेच तलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीय. यामागे काही विशिष्ट हेतू तर नाही ना, असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले कि, “एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं काही नवीन नाही. या सगळ्या मंडळींनी मागच्या लोकसभेत देखील हातात हात घालून मोठी आघाडी निर्माण केली. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उत्तरप्रदेश सह विविध राज्यांमध्ये या लोकांनी हा प्रयत्न करून बघितला आहे, मात्र त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. उलट तलेंगना मध्ये जी टीआरएस पार्टी आहे, त्याचीच परिस्थिती विकट आहे. नंबर एकचा पक्ष भाजपच असेल.” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
एकूणच राज्यात सध्या राजकीय वातावरण गरम आहे, यामध्ये पुढे काय होतं, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
