केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला नऊ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने मोदी@9 हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची 21 जून रोजी स्थानिक नेहरू मैदान येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाला अभियान संयोजक आमदार प्रवीण दरेकर, भाजपा विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रातील मोदी सरकारने नव वर्षात देशातील विविध घटकांसाठी लोककल्याणकारी योजना राबवून त्याची प्रभावी अंमलबजावणी देशभरात केली. ही माहिती घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी @9 हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात केलेले कामकाजाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजता स्थानिक नेहरू मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला आमदार प्रवीण दरेकर, भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर उपस्थित राहणार आहेत. या सभेला नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
2014 पासून देशात महापरिवर्तन
2014 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी त्यांनी संविधानाचा व लोकशाहीचा आदर केला. जगभरात भारताची मान स्वाभिमानाने उंचावली असून देशभरात नऊ वर्षात महापरिवर्तन झाल्याची माहिती खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी यावेळी दिली. तसेच विविध क्षेत्रातील एक हजार नागरिकांना भेटून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकरिता 2024 साठी आशीर्वाद सुद्धा मागितले जात आहेत. त्यासाठी 9090902024 हा संपर्क क्रमांक सुद्धा जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सेवा, सुशासन अन् गरीब कल्याणातून देशाची प्रगती
पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार डॉ.अनिल बोंडे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात सेवा, सुशासन, अन् गरीब कल्यानाद्वारे भारताचा चेहरा मोहरा बदलला. मोदी @9 हे अभियान शहरात व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आले असून त्या अंतर्गत विकासार्थ तीर्थ, व्यापारी संमेलन, सोशल मीडिया मिट, संयुक्त मोर्चा, टिफिन विथ मीटिंग इत्यादी कार्यक्रम राबविन्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
