उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस कर्तृत्वाचे धनी आहेत तर उद्धव ठाकरे कलंकित करंटा आहे अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले.देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘ईट का जबाव पत्थर से’ देणार असल्याचा इशारा दिला आहे.
नागपुरात पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरे तुमचे संतुलन बिघडले असेल, तर मनोरुग्णालयात जा. नागपुरात मनोरुग्णालय आहे. तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आत्ता रस्त्यावर आंदोलन केलेय, पुढचे आंदोलनात आमचे लोक तुमच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल, अशा शब्दात त्यांना स्पष्ट इशारा दिला.
देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी आहेत. तर, उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा आहे, असे सांगून श् बावनकुळे म्हणाले,”यापुढे तुम्ही पुन्हा असे काही बोललात तर नागपूरची जनता तुम्हाला जोड्याने बदडेल.बावनकुळे म्हणाले, फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी डेटा तयार केला. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकविले व परत मिळवून दिले. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे नेटवर्क देवेंद्र फडणवीस यांनी उभारले . महाराष्ट्रातील जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवारसारखी योजना सुरु केली. राज्यात लोड शेडिंग कमी करण्यासाठी योजना राबविली. एक रुपयांत पीक विमा योजना आणली. महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग तयार केला. ही देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आहे.
उद्धव ठाकरेंची सुरुवात माझे वडील, त्यापुढे माझा कॅमेरा, माझी पत्नी. वयाच्या ६० व्या वर्षी मी, माझा मुलगा, मंत्री, माझी पत्नी आणि मुख्यमंत्री असा असून तेच ‘कलंक’ आहेत, असे सांगून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ठाकरेंनी मराठा समाजाचे, ओबीसींचे आरक्षण घालविले. स्वत:च्या अहंकारासाठी जलयुक्त शिवार योजना बंद पाडली. कमिशन मिळत नसल्याने मेट्रो प्रकल्पाची कामे बंद पाडली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला अंधारात लोटले.
