शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार, लवकरच मिळणार पीएम किसानचा 14 हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधी योजनेतून केंद्र सरकारकडून वर्षाला ६ हजार रूपये खात्यात जमा होतात. ४ महिन्यांच्या अंतरातून दोन हजार रूपये प्रमाणे तीन टप्प्यात ६ हजार रूपये दिले जातात. परंतु यंदाचा पीएम किसानचा 14 वा हफ्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही.

याआधी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात १३ वा हप्ता जमा झाला होता. हा १३ वा हफ्ता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

लवकरच 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता 15 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. त्यामुळं लवकरच शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.याआधी 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 13 वा हप्ता जमा झाला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता जारी करण्यात आला होता. वास्तविक, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. मोदी सरकार हे पैसे दोन हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये ही मदत जारी करते.

ऑनलाईन ‘ई-केवायसी’ कसे अपडेट करा

– ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
– या वेबसाइटवर ई-केवायसी पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
– ई-केवायसीच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल.
– त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
– यानंतर पीएम किसान निधीशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओ.टी.पी येईल.
– तो ओ.टी.पी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
– या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.