असं कसं लॉकडाउन?

महाराष्ट्रात सध्या कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस विकट होत चालली आहे. दर दिवशी नवे रुग्ण, दर दिवशी मृतकांच्या आकड्यांंमध्ये वाढ अशी सर्व परिस्थिती पाहता काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ‘ब्रेक द चेन’ ही मुहीम हातात घेतली असल्याची दिसते. ही मोहीम आगळे वेगळे काही नसून एक प्रकारचे लॉकडाउनच आहे. यामध्ये काल रात्री ८ वाजे पासून महाराष्ट्रात संचारबंदी म्हणजेच कलम १४४ लागू करण्यात आली आहे. या नुसार विना कारण महाराष्ट्राच्या जनतेचा घराबाहेर फिरता येणार नाही.

मात्र सर्व पब्लिक ट्रांसपोर्ट अर्थात वाहतूक सुरु असेल, लोकल सुरु असतील, ऑटो रिक्शा सर्व सुरु असेल. शीतगृहे, वेअर हाउसेस सुरु असतील. अत्यावश्यक सेवांमध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी सुरु असतील. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत काय सुरु असेल आणि काय बंद याची माहिती देखील दिली आहे. तरी काल त्यांच्या फेसबुक लाईव्ह नंतर अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता कि नेमके हे ल़कडाउन कशाप्रकारचे आहे.



म्हणजे कलम १४४ सुरु तर असणार आहे, मात्र तरी देखील अनेक गोष्टी सुरु असतील. याचा समतोल कसा साधायचा ? तसेच या संपूर्ण ‘ब्रेक द चेन’ मोहीमेत छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. शिवभोजन थाळी आणि इतर मदत जरी सरकारने केली तरी देखील मंदिराबाहेर बसणारे फुलवाले, बागेबाहेर असणारे फुगेवाले अशा सर्वांचे काय नियोजन आहे ? याशिवाय सरकारने व्यवस्था सुधारणेकडे लक्ष दिले आहे का ? म्हणजेच महाराष्ट्रातील हॉस्पिटल्समध्ये असलेली बेड्सची कमी, रेमडेसवीर इंजेक्शन्सची कमी याकडे लक्ष देण्यात आले आहे का ? सध्या महाराष्ट्र एका विचित्र परिस्थितीतून जात आहे, असे असताना केवळ लोकांना घरी थांबायला सांगून या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येणार नाहीये, तर प्रशासनाने व्यवस्था सुधारणेकडे आणि समाजातील काही महत्वाच्या घटकांकडे लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे, हे देखील समजून घ्यावे लागेल.


एकूणच महाराष्ट्रात परिस्थिती खूब खराब आहे, त्यातून प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या नवनवीन घटना, गृहमंत्र्यांपासून ते काही प्रमुख मंत्र्यांचा त्याच्याशी संबंध हे सर्व पाहता आज महाराष्ट्राती जनता खऱ्या अर्थात ‘हेल्पलेस’ झाली आहे. जनतेला एका खमक्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. जो आज महाराष्ट्राला या परिस्थितीतून तारून नेईल.