महाराष्ट्रात १० वी १२ च्या परीक्षा लांबल्या.. कोविडमुळे सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्राच कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चाललेली आहे. एका दिवसात ६० हजारांहून अधिक केसेस आल्या आहेत. असे असताना महाराष्ट्र सरकारने १०वी आणि १२वीच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली असून महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे त्यांनी सांगतिले.


या संदर्भात पुढे माहिती देत त्या म्हणाल्या मे च्या शेवटी १२वीची परीक्षा घेण्यात येईल तसेच जूनमध्ये १०वीची परीक्षा आयोजित करण्यात येईल. तसेच सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाला देखील विनवणी करण्यात आली आहे, कि त्यांनी देखील त्यांच्या १०वी १२वी च्या परीक्षांचा पुनर्विचार करावा. एकूणच महाराष्ट्राची परिस्थिती पाहता मुलांनी परीक्षेसाठी बाहेर पडण्यात पालकांच्या मनात सुद्धा भिती आहे.

महाराष्ट्रात एका दिवसात सुमारे ६० हजारांहून अधिक कोरोना पेशंट्स आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या जनतेच्या मनात भिती आहे. जनतेला रुग्णालयांमध्ये बेड्स मिळत नाहीयेत, रेमडेसवीर इंजेक्शन्स मिळत नाहीयेत. एकएका घरात संपूर्ण परिवार कोविड पॉजिटिव्ह होतोय. ही दुसरी लाट केवळ लाट नाहीये तर सुनामी आहे. आणि ही संपूर्ण परिस्थिती सरकारला सांभाळता येत नाहीये.

जनतेला एकच आवाहन आहे कि आपली काळजी घ्यावी, खूप महत्वाचे काम असल्या शिवाय घरातून निघू नये आणि सतत मास्क घालावा आणि हाथ सेनेटाइज करावे. एकत्र मिळूनच ही परिस्थिती आपण बदलू शकतो.