
२०२० मध्ये कोरोनाचा पहिल्या रुग्ण महाराष्ट्रात ज्यावेळी आढळला त्यावेळई कुणी कल्पना देखील केली नसेल कि महाराष्ट्रा देशातील कोरोना केसेसच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक प्रभावित राज्य ठरेल. जिथे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळतील आणि सर्वाधिक मृत्यु देखील महाराष्ट्रातच होतील. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आता कुठे जरा बरी परिस्थिती बघायला मिळतेय. निदान आकडे तरी हेच सागंतायेत. रविवारी महाराष्ट्रात २९,११७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता, तर २६,६७२ नवीन रुग्ण आढळले. याचा अर्थ बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच कोरोनाचा कर्व्ह निदान महाराष्ट्रात तरी डाउन व्हायला सुरुवात झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. मात्र तरी देखी २६ हजार + हा आकडा चिंताजनक आहे, आणि अजून देखील आपण सगळ्यांनी काळजी घेणं नितांत आवश्यक आहे.
आजतागायत महाराष्ट्रात एकूण ५१,४०,२७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट सुधारला आहे, आणि तो ९१.१२% आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात ५९४ कोरोना रुग्णांचा रविवारी मृत्य झाला. राज्यातील सध्या मृत्युदर १.५९% आहे. राज्यात सध्या २६,९६,३०६ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत तर २१,७७१ रुग्ण संस्थानात्मक क्वारंटाइन आहेत. एकूण एक्टिव्ह रुग्णांची संख्या ३,४८,३९५ इतकी असल्याचे म्हटले जात आहे.
एकूणच परिस्थिती पाहता, बरे दिवस येणार असल्याची चाहूल जरी लागली असली तरी धोका अजून टळला आहे, असे म्हणता येणार नाही. गेली दीड वर्ष महाराष्ट्राला कोणाची तरी दृष्ट लागली असल्याप्रमाणे महाराष्ट्राचे हाल होत आहेत, असे दिसून येत आहे. मग ती कोरोनाची भीषण परिस्थिती असू देत, त्यामुळे महाराष्ट्रात वाढलेली बेरोजगारी असू देत, नाही तर तॉक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान असू देत, परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे सुमारे १०० कोटींचा समोर आलेला भ्रष्टाचार असू देत, सुशांत सिंह आणि दिशा सालियान यांचे रहस्यमय मृत्यु असू देत किंवा अगदी अनेकदा अनेक ठिकाणी समोर आलेली सरकारची नाकामी असू देत, महाराष्ट्र गेल्या दीड वर्षात अनेक समस्यांना सामोरे जात आहे.
असे असताना एक सामान्य नागरिक म्हणून आपण सर्व नियम पाळले पाहीजेत, आपल्यामळे ही महामारी आणखी तर पसरणार नाही ना ? याकडे लक्ष दिले पाहीजे, आणि आपण संपूर्ण काळजी घेतली पाहीजे, कारण आपण तेवढेच करू शकतो. ही परिस्थिती लवकरात लवकर बदलावी आणि महाराष्ट्रात पुन्हा सुवर्ण दिवस यावे, यासाठी प्रार्थना करूयात.
