परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना RTPCR टेस्ट अनिवार्य…!


महाराष्ट्रात कोव्हिडच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही नियम कडक केले आहेत. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना कोव्हिड चाचणी म्हणजेच RTPCR टेस्ट अनिवार्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली, तसेच “ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दृष्टीने आपण आतापासूनच अधिक काळजी घ्यायला हवी.” असेही ते यावेळी म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, काल केंद्र सरकराचे आणि आपल्या नियमावतील थोडीशी तफावत होती, पण रात्री उशीरा एकसारखे नियम असावेत यावर चर्चा झाली.  परदेशातून भारतातील विमानतळावर प्रवासी आले तर एकसारखा नियम असावा असा प्रयत्न आपण केला आहे. देश म्हणून एक नियम असायला हवेत.  इतर राज्यातून येणाऱ्यांना 48 तासाचा आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागतो.  आपण इतर राज्यात जातो तेव्हा आरटीपीसीआर रिपोर्ट लागतो, तर आपल्या राज्यात येण्यासाठी देखील लागेल, असं पवार म्हणाले. 

शाळा सुरु करण्याबाबत देखील पवार म्हणाले कि, “ज्यावेळी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी १ डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी हा नवा व्हेरिएंट आला नव्हता. मात्र आता याविषयी विचार करावा लागेल. मुंबई महानगर पालिकेने १५ डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र संपूर्ण राज्यात शाळा सुरु करण्याविषयी आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही.

एकूणच नवीन व्हेरियंटला बघता पुढे काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.