राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल केलेली टिप्पणी अपमानास्पद, आम्ही याचा निषेध करतो : देवेंद्र फडणवीस


द्रौपदी मुर्मू या आपल्या माननीय राष्ट्रपती आहेत. त्यांच्यावर काँग्रेस अधिकारी अधीर रंजन चौधरी ने केलेले वक्तव्य अतिशय अपमानास्पद आहे. आम्ही याची निंदा करतो. देशाला एक आदिवासी महिला राष्ट्रपती मिळणे एक अत्यंत गौरवाचा क्षण आहे, आणि असे असताना त्यांच्यावर केलेली ही टिप्पणी म्हणजे केवळ त्यांचाच नाही तर देशाचा देखील अपमान आहे. असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी काल देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना “राष्ट्रपत्नी” असे संबोधित केले होते. ज्यावरुन संसदेत देखील गदारोळ झाला. अमेठी येथून खासदार आणि मंत्री स्मृती इराणी यांनी काल संसदेत या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आणि सोनिया गांधींसह काँग्रेसच्या सर्व नेत्यांना देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागण्याचे आव्हान केले.



यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील आपला तीव्र निषेध जाहीर केला आहे. हा केवळ मुर्मू यांचा अपमान नसून संपूर्ण देशाचा अपमान याठिकाणी झाला आहे, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे.

काँग्रेसला हे एक वक्तव्य अतिशय महाग पडणार असे दिसते आहे, या बाबतीत पुढे काय होते, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.