अटक म्हणजे कर्माची फळं : बघा काय म्हणाले मुनगंटीवार ?


संजय राऊत यांच्या अटकेवर चारी बाजूने चर्चा सुरु आहे. रविवारी रात्री उशीरा ईडी ने शिवसेना खासदार संजय राऊत यांना अचक केली. त्यांना आज न्यायालयासमोर दाखल करण्यात आले होते. नयायालयाने त्यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडीची कस्टडी सुनावली आहे. असे असताना राऊत यांच्यावर चारी बाजूंनी टीका होते आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील टोला लगावला आहे. ते म्हणाले कि, “संजय राऊत कधीच सामान्य माणसांच्या प्रश्नावर बोलले नाहीत. आणि आज त्यांना झालेली अटक ही एका सामान्य राज्यकर्त्याला होईल तशी अटक आहे, राऊत यांनी नेहमीच खलनायिकी राजकारण केले आहे, आणि त्यांचे कर्मच त्यांना फळ देऊन गेले आहे.” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.



मुनगंटीवार यांनी राऊत यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी कधीही वंचितांचे आणि बेरोजगारांचे-शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. राऊत हे अडीच वर्ष खलनायकी भूमिकेत होते. त्यांनी कधीही वंचितांचे प्रश्न मांडले नाही. त्याऐवजी आमदारांना रेडे म्हणत अपशब्द वापरले. 70 सेकंदात 70 शिव्या देण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

राऊतांनी राज्याला बदनाम करण्यासाठी शेतकरी आंदोलनातील टीकैत यांचीही गळाभेट घेतली होती. सत्तेत असताना आपण अमर पट्टा घेऊन आलो आहोत, असा भाव राऊत यांचा होता. कधी पत्रा चाळवासीयांचे दुःख समजून घेतले पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले. मुंबईकरांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी मेट्रो महत्त्वाची आहे. ती देखील यांनी अडवली, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. वकिलांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अटक ही तर श्रींची इच्छा, असेही मुनगंटीवार म्हणाले.

या प्रकरणात आता पुढे काय होते ? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.