उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी आमची सगळी कामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं. माझ्या स्वतःच्या मतदार संघातली कामं त्यावेळी तुम्ही रोखली होती. भाजपच्या सगळ्या आमदारांची कामे रोखली. अडीच वर्ष भाजपच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही.
आम्ही बदल्याची भावना ठेवणार नाही. ज्या काही स्थगित्या दिल्या होत्या, त्यातल्या 70 टक्के स्थगिती रद्द केली आहे. 30 टक्के स्थगिती यासाठी ठेवली आहे की, त्यामध्ये निधी वाटप करताना तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आलेला नाही. जिथे 2 हजार कोटीची तरतूद आहे. तिथे 6 हजार कोटी वाटलेले आहेत. त्यामुळे हिशोब पाहून बजेट मंजूर होईल.
आवश्यक त्या तरतूदी ठेवल्या आहेत. त्याही संदर्भात योग्य निर्णय आम्ही अवश्य घेऊ. भेदभाव ठेवण्यात येणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
