आम्ही विश्वात बंधुभावाच्या बाजूने आहोत. आम्हाला कोणाला घाबरवायचं नाही. गेल्या काही वर्षांत समाजाला तोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. उदयपूर, अमरावती अशा काही घटना झाल्या आहेत. यावेळी मुस्लिम लोकांनीही विरोध केला. अन्यायाविरुद्ध असंच उभं रहायला हवं. हिंदू समाज गुन्हेगारांच्या पाठीशी कधीच उभा राहत नाही. सगळ्यांनी असं वागायला हवं, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात सध्या सुरू असलेल्या एका कटाचा उल्लेख केला. भागवत म्हणाले, भारत पुढे चालला आहे मात्र असुरी शक्तींना ते काही पसंत पडलेले नाही. भारताला तोडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. भागवत यांनी कुणाचेही नाव न घेता हे वक्तव्य केले त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, याबाबत अनेक तर्क व्यक्त केले जात आहेत.
शत्रूंना आश्रय द्यावा म्हणून ते आमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राष्ट्रविरोधी बाबींचा निषेधच करावा लागेल, असं मोहन भागवतांनी म्हटलं.ही कारवाई जी चालू आहे त्यात भोळेपणाने सामावून जाऊ नये. त्यामुळे समाजाचं सहकार्य आवश्क आहे, असं म्हणताना त्यांनी अप्रत्यक्षपणे पीएफआयवर निशाणा साधला.जोपर्यंत पालक मुलांना केवळ पैसा कमावण्याच्या हेतूने शिक्षण, डिग्री घ्यायला प्रेरित करत आहेत, तोपर्यंत संस्कार कसे घडणार? असा प्रश्न सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला आहे.हल्ली उच्च शिक्षणापर्यंत बहुतांश मातृभाषेत शिक्षण मिळतं. इंग्रजीचा फार बाऊ केला जातो. पण ते तितकंसं गरजेचं नाही. करिअर करण्यासाठी वेगळ्या गोष्टी लागतात, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं.मोहन भागवत यांनी म्हटलं की, सगळे प्रसिद्ध लोक मातृभाषेत शिकलेत.आपण आपल्या भाषेत सही करतो का? दारावरची प्लेट इंग्रजीत असते का? लग्नाची पत्रिका इंग्रजीत छापली जाते.
नागपूर येथे भगवान जगन्नाथ पुरी दर्शनानंतर आयोजित समारोहात त्यांनी हे वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले, भारतातील सर्वच लोक पुढे चालले आहेत. मात्र काही दानवी शक्तींना याचा त्रास होत आहे. हे लोक वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून भांडणे लावण्याचे काम करत आहेत. यासाठी त्यांच्याकडे विविध प्रकारचे प्लॅन तयार आहेत.या सोहळ्याला पद्मश्री संतोष यादव प्रमुख पाहुणे आहेत. त्याचबरोबर विदर्भातील भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
