वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्यांना हिंसाचाराचा काँग्रेस नेत्याच्या सल्ला

दावणगेरे : कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि दावणगेरे येथील माजी नगरसेवक कबीर खान यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना भडकावणारे वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
( Congress leader warns of violence against those opposing Waqf Amendment Bill)

वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर होऊन कायद्यात रूपांतर झाले असले तरी देशभरात त्याविरोधात निषेध सुरु आहेत. याआधी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. अशा पार्श्वभूमीवर कबीर खान यांनी आंदोलनकर्त्यांना “रस्त्यावर उतरा, जाळा, मरा आणि बलिदान द्या” असा सल्ला दिला आहे.

सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ते म्हणताना दिसतात, “पोस्टर धरून किंवा निवेदन देऊन काहीच होणार नाही. रस्त्यावर उतरा. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करा, ट्रेन आणि बस जाळा. प्रत्येक गावात ८-१० लोक मरायला हवेत. ५०-१०० गुन्हे दाखल झाले पाहिजेत. एवढ्या सोप्या पद्धतीने हे विधेयक मागे घेतले जाणार नाही.”

कबीर खान यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर संताप व्यक्त केला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचवणारे असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी होत आहे.