विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 48 वर्षात जे कमावलं, ते याने अडीच वर्षात साफ करुन टाकले असा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत राज शिवसेनेत आला की, तो प्रमुख होणार. उद्धव ठाकरे नगण्य आहे. त्यामुळे तो नाही बोलवणार असे भाकीत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी वर्तविले आहे. मात्र ओरिजन शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे हे देखील त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ठाकरे गट माणसे संभाव्य युतीवर ते म्हणाले, काय भविष्य? भविष्य असतं तर हे वेगळे झाले असते का? सत्ताधारी पक्षाची संख्या 235 आहे. आता यांना मराठी माणूस आठवला. पण त्यांच्यासाठी काय केलं. आज मराठी टक्का फक्त 18 टक्के आहे. 1960 साली 60 टक्के होता. याचं कारण काय? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मग गेली कुठे?”
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरील कार्यकालावर टीका करताना राणे म्हणले, मुख्यमंत्रीपदाचं महत्त्वच त्यांना कळलं नाही. त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले. काय केलं महाराष्ट्रासाठी? मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली. पण मराठी माणसासाठी, तरुणासाठी, त्यांच्या नोकरीसाठी. पोटापाण्याच्या प्रश्नासाठी काय केले? मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही.
राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जात आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का? हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आमच्या मार्गदर्शनाचा प्रश्न नाही. शेवटी घरं आहे, बंधुत्व आहे. कोणी कुठे जावं हा व्यक्तीगत प्रश्न आहे असे सांगून नारायण राणे म्हणाले. राज यांनी शिवसेनेत यावं, असं ते कधीच म्हणू शकत नाही. कारण तसं झाल्यास अस्तित्वच राहणार नाही. राज शिवसेनेत आला की, तो प्रमुख होणार. उद्धव ठाकरे नगण्य. त्यामुळे तो त्यांना बोलवणार नाही.
दोन भाऊ एकत्र येतात हा भाजपला प्रॉब्लेम आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात, यावर राणे म्हणाले, दोन भाऊच कशाला, सगळे भाऊ घ्या. आम्हला फरक पडत नाही. भाजप आणि आघाडीचे तिन्ही पक्षांचे आज 235 आमदार आहेत. एवढं प्रेम उतू जातय तर, मातोश्रीचा एक भाग देतोस का?”
बाळासाहेबांनी 48 वर्षात जे कमावलं, ते याने अडीच वर्षात साफ करुन टाकलं. ओरिजन शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे असे सांगत नारायण राणे म्हणाले. “मराठीचा पुळका आलाय मग मुलांना का इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकवलं. स्कॉटिशमध्ये कोणाला पाठवलं, याचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी ते उदहारण दिले .
