विशेष प्रतिनिधी
पुणे : मेट्रोमनी साइटवरून ओळख करून घेतलेल्या महिलेची आर्थिक फसवणूक करीत तिच्याशी शारीरिक संबन्ध प्रस्थापित करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( Jeevan Saathi Matrimony site fraud
Young woman files complaint of rape and financial fraud)
जीवनसाथी मेट्रोमोनी साईटवरून माहिती काढून हि फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २५ सप्टेंबर २०२४ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधी दरम्यान वेळोवेळी पुण्यामध्ये घडला.
अमित गंगाधर शेंडगे (रा. पारगाव, दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांकडे ३३ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादीने जीवनसाथी मेट्रोमोनी साईटवर माहिती भरलेली होती. आरोपीने या तरुणीचे प्रोफाईल पाहून तिच्याशी संपर्क साधला. तिच्याशी ओळख करून लग्नाचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर तिला भेटून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. त्यानंतर, तिच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. पैसे दिले नाही तर हॉटेलच्या रूममधील फोटो गावी पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने या तरुणीने आरोपीला आतापर्यंत वेळोवेळी दोन लाख रुपये दिले. फिर्यादीने आरोपीला लग्नाबाबत विचारणा केली असता टाळाटाळ करून ‘तू जर मला लग्नाबाबत विचारणा केली, तर विष पिऊन तुझे आणि तुझ्या घरच्यांची नावे लिहून आत्महत्या करेन’ अशी धमकी दिली.
