पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असल्याने त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आले. आज, मेट्रो एकच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कामाचे भूमिपूजनही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. “आज सत्तेत असलेले सर्व मंत्री पहिल्या टप्प्यातील उद्घाटनावेळी विविध रोलमध्ये होते”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनावेळी म्हणाले.पण आता मात्र पुण्याच्या स्वप्नांना गती देण्याकरिता, आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. पुणे देशातील उत्तम शहर आहेच पण मोदींच्या नेतृत्वात ते सर्वोत्तम करून दाखवू, असा विश्वास असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत. प्रत्येकाला घर देण्याचे मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.पुणे ही जशी उद्योग नगरी आहे तशीच स्वप्न पूर्ण करणारी नगरी म्हणूनही आम्ही पुण्याचा विकास करु, असाही विश्वास त्यांनी पुणेकरांना दिला आहे. पुणे हे राज्यातीलच नाही तर देशातील उत्तम शहर आहेत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वोत्तम पुणे करुन दाखवू, असंही ते म्हणाले.
आजच्या मेट्रोचे महत्त्व म्हणजे दोन लाईन आता क्रॉस होत आहेत. त्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याकरीता मोठी मदत होणार आहे. जेव्हा वाढीव टप्प्याचे काम पूर्ण होईल तेव्हा ट्रॅफीकची समस्या कमी होईल. त्यासोबत पिएमपीएलमध्ये मागच्या काळात आपण निर्णय घेत इलेक्ट्रिक बस घेतल्या. नरेंद्र मोदी यांचे स्वप्न प्रदूषण न करणारी ट्रान्सपोर्ट पुणे शहरात होत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.12 हजार घरांपैकी काही घरांचं हस्तांतरण होणार आहे. काहींचं भूमीपूजन होणार आहे. मला विश्वास आहे, येत्या काळात या देशात एकही बेघर राहणार नाही हे पीएम मोदींचं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्णकरण्याकरीता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए निश्चितपणे कार्य करेल. पुणे ही उद्योगिक आणि आयटी नगरी आहे. पुण्याला स्वप्नपूर्तीची नगरी अशी ओळख निर्माण करुन देऊ, असंही ते म्हणाले. असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
