केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी दसऱ्याच्या सुभ मुहूर्तावर राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग येथील राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर आज सकाळी निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगितले. अशी माहिती रविंद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
कार्यकर्त्यांची कामे होत नसल्यामुळे नीलेश राणे नाराज होते. मात्र, आता त्यांची नाराजी दूर करणार असल्याचे रवींद्र चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले आहे.निलेश राणे हे भाजपचे माजी खासदार आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण तापले होते. निलेश राणे यांचे.कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी. कणकवली या त्यांच्या निवासस्थनी दाखल झाले होते. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांचे राजीनामे दिले होते.
निलेश राणे यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सिंधुदुर्ग लोकसभेची जागा हे रविंद्र चव्हाण लढवू शकतात. अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर निलेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा घेतला आहे.
