किरण सामंत निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले; निलेश राणेंचा खळबळजनक दावा

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून भाजपला फक्त 9 जागा जिंकता आल्या आहेत, यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेचाही समावेश आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा पराभव केला. या मतदारसंघात विजय झाल्यानंतरही स्थानिक भाजप आणि शिवसेनेतला वाद समोर आला आहे. किरण सामंत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे.

निलेश राणे म्हणाले की, किरण सामंत हे व्यावसायिक आहे. व्यावसायिकांवर मी का बोलावे? ते कुठल्या पदावर नाहीत. त्यांनी मागणी केली त्याला काही तरी बेस लागतो. निवडणुकीच्या काळात समन्वय का राखला नाही याचा अभ्यास सामंत यांनी करावा. या निवडणुकीत किरण सामंत हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेना भेटले. किरण सामंत उद्धव ठाकरे यांना निवडणुकीच्या काळात का भेटले हे माहीत नाही. शिंदे साहेबांना आम्ही या सर्व गोष्टी सांगणार आहोत. मी याचे पुरावे देणार आहे. सामंत जे वागले ते आम्ही विसरणार नाही. असं निलेश राणे म्हणाले.

भाजपने मला कुडाळ, मालवण मतदारसंघाची जबाबदारी दिली, पण काही लोकांनी कारण नसताना मागणी केली. त्यांचा जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस यांनी मागणी केली होती. आमची सर्व भाजपची मतं आहेत, आम्ही त्या मतदारसंघाच 10 हजार मतांनी मागे आहोत. उदय सामंत पालकमंत्री आहेत, पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती, ती त्यांनी केली नाही, आम्ही रत्नागिरीमधून अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत, असं म्हणत निलेश राणेंनी नाराजी व्यक्त केली.