स्वस्ति निवास’ हे कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल, अमित शहा यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

नागपूर : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना सेवाभावाने झाली. समाजात कोणी दुःखी राहू नये, या विचाराने झाली. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत ही संस्था देशातील सर्वोत्तम कॅन्सर इन्स्टिट्यूट राहील, असा विश्वास आहे. त्यातील स्वस्ति निवास’ हे कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितशहा यांनी व्यक्त केले. ( Amit Shah believes that Swasti Niwas will be known as a center that preserves family sentiments.)

शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जामठा परिसरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या (एनसीआय) स्वस्ती निवास या इमारतीचे भूमिपूजन, तसेच कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना आरोग्य सुविधांवरून काँग्रेसवर हल्लाबोल चढविताना शाह म्हणाले,
काँग्रेसचे नेते संस्कार नसल्याने काहीही बोलतात. मग मी बोललो तर त्यांना वाईट वाटते. 2014 साली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात 37 हजार कोटी रुपये आरोग्य विषयक आर्थिक तरतूद बजेटमध्ये होती जी 2025 मध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळात एक लाख 35 हजार कोटींवर पोहोचली असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.पाच लाख रुपये पर्यंतची 60 कोटी जनतेला मोफत उपचाराची सुविधा, 70 वर्षांवरील जेष्ठांना मोफत उपचार अशा विविध योजनांचा आढावा त्यांनी त्या निमित्ताने घेतला.
शहा म्हणाले, 2014 साली देशात 7 एम्स होते आता 23 एम्सना मंजुरी देण्यात आली याकडेही लक्ष वेधले. मात्र आज आरोग्याच्या वाढत्या समस्या लक्षात घेता सरकार एकट्याने आरोग्य यंत्रणा, आवश्यक सुविधा देऊ शकत नाही अशावेळी आबाजी थत्ते अनुसंधान संस्थान सारख्या चांगल्या संस्थांची गरज आहे. भविष्यात त्यांच्याकडून चालविले जाणारे नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट एनसीआर देशात सर्वात चांगले ठरेल या ठिकाणी संशोधनावर अधिक भर दिला जावा, यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल.
आपल्या कुटुंबात कर्करोगामुळे यातना भोगल्याने त्यापासून समाजाची मुक्ती करण्याच्या संकल्पातून हा प्रकल्प उभारल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि शैलेश जोगळेकर यांची अमित शहा यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्री प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयात कलम 370 हटविणे, देशभरात कुठेही आपत्ती व्यवस्थापनात पुढे असलेले देशाचे लोहपुरुष असा अमित शहा यांचा उल्लेख केला. मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातून रुग्ण येतात. नातेवाईकांना निवारा म्हणून ही सुविधा उभी होईल.भविष्यात एनसीआय कर्करुग्णांसाठी देशात प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून नावारूपास येईल असा विश्वासही व्यक्त केला.