बंडू आंदेकर विरोधात पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई, जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, सात जणांविरुद्ध कारवाई

पुणे :- जेलमध्ये असतानाही बंडू आंदेकरच्या नावावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Another major police action against Bandu Andekar police raid on gambling den action against seven people)
गुरुवारी साडेचारच्या सुमारास पोलिसांनी नागेश्वर मंदिर परिसरात सोमवार पेठे येथे कारवाई करत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ५६६५ रुपये जप्त केले. तसेच महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील संशयित आरोपी ज्ञानोबा दत्तू सुपारे, नितीन धोंडू पांचाळ, मनोज गोविंद पवार, दिलीप तुकाराम पालकर, संतोष रामचंद्र कड, प्रविण उर्फ बाला राजेंद्र चव्हाण अशी या सात जणांची नाव असल्याची माहिती पोलीसांकडून मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *