मुंबईच्या प्रॉपर्टीचे रेट परवडत नाहीत म्हणून मागील काळात आयटी आणि आयटीशी संबंधित उद्याेग काही प्रमाणात बंगळुरू, हैद्राबाद येथे गेले. सरकार विविवध माध्यमांतून तयार करत असलेल्या कनेक्टिव्हिटीमुळे तिसऱ्या मुंबईची इकोसिस्टिम तयार होणार आहे. त्यामुळे परत गेलेलेच नव्हे तर नवे
आयटी उद्याेगही येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
टीव्ही 9 वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात बाेलताना फडणवीस म्हणाले, मुंबईच्या दोन मेट्रो सुरू केल्याने प्रवासी संख्या पाच-सात लाखापर्यंत चालली आहे. अंडरग्राऊंड मेट्रो सुरू झाल्यानंतर १७ लाख प्रवासी त्या मेट्रोला मिळणार आहेत. नव्या मुंबईचे विमानतळ सुरु झाल्यानंतर विकासाची गती वाढेल. ट्रान्स हार्बर लिंकचे सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबईला नवीन मुंबईशी जोडतो आहोत.नव्या एयरपोर्टच्या परिसरात आपणी तिसरी मुंबई वसवतो आहोत. आपण डेटा सेंटरपॉलिसी तयार केली. आज देशात जेवढी डेटा सेंटर क्षमता तयार झाली त्यातली ६० टक्के क्षमता महाराष्ट्रात तयार केली. त्यामुळे जे नवे उद्योग आपल्याकडून बाहेर चालले होते, ती सगळी आपल्याकडे परत येणार आहे.
