आताच्या घडीला राज्यातील राजकारणात अनेक मुद्द्यांवरून आरोप -प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच काही पक्षांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे सांगिले जात आहे. सन २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीसह राज्यातील विधानसभा निवडणुका होतील, असा कयास बांधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे सांगितले असून, किती जागांवर उमेदवार देणार, याचा आकडा बच्चू कडू यांनी सांगितला आहे.
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप – शिंदे गटासोबत युती झाली तर योग्यच. अन्यथा १५ विधानसभा जागा लढवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. युतीसाठी आग्रह करु, पण, युती नाही तर स्वतंत्र लढणार असंही बच्चू कडू म्हणाले. नागपुरात ते बोलत होते. राज्यपाल शपथविधीच्या पत्रिका छापायला गेल्या आणि मंत्रिमंडळ विस्तार होत आहे अशी चर्चा मंत्रालयात रंगल्या. १८ -१९ तारखेला शपथविधी आहे. अशा प्रकारे आमदारांचे एक दुसऱ्याला फोन सुरु झाले. निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या निर्णयावर मंत्रिमंडळ विस्तार थांबलाय.
दिव्यांग मंत्रालयाचं काम सुरु केलं. मला चिंता नाही. दिव्यांग मंत्रालयाचं काम सुरु केलंय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिव्यांग मंत्रालयाच्या बैठका घ्या. विस्तारापूर्वीच बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालयाची सूत्र हाती घेतली. मंत्री पद नाही दिलं तरी चालेल परंतु जिल्ह्यात दिव्यांग विभागाच्या बैठका घेण्याचा अधिकार द्या असंही बच्चू कडू यांनी म्हंटलं.
