चिंचवड पोटनिवडणुकीत फडणवीसांची एंट्री, मध्यरात्री पोहोचले जगतापांच्या घरी

कसबा आणि चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक ऐन रंगात आली आहे. यामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असतांना दुसरीकडे भाजपची मॅरेथॉन बैठक पार पडली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीस एकूण चार मंत्री उपस्थित होते. तब्बल सात तास ही मॅरेथॉन बैठक पार पडली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत विविध घटकातील प्रमुख लोकांची उपस्थिती होती. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निवस्थानी ही बैठक पार पडली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी व्यापारी वर्गातील काही दिग्गज मंडळींचीही भेट घेतली आहे. ज्यांचा पुण्यातील कसबा पेठ मतदार संघात मोठा व्यापारी वर्ग आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मध् रात्री अचानक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांना भेट दिली आमदार लक्ष्मण जगताप यांचा बुधवारी जन्मदिवस होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री जगताप कुटुंबीयांना भेटून त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीच्या प्रचाराबद्दल चौकशी केली चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे याला निवडणुकीच्या रिंगणात उभा करण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी त्यांचं घर सांभाळावं उगीच आमच्यावर टीका करून खापर फोडू नये असा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला.