
गेले दोन दिवस झाले महाराष्ट्रात प्रदीप शर्मा हे नाव मोठ्या प्रमाणात गाजतंय. एंटालिया प्रकरणात प्रदीप शर्मा यांचे नाव पुढे आले आहे, आणि दोन दिवसांपूर्वी प्रदीश शर्मा या मोठ्या माजी पोलिस अधिकाऱ्याला, महाराष्ट्र पोलिसातील एनकाउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या एका महत्वाच्या व्यक्तिला एनआयए ने अटक केली आहे, मात्र ही अटक का करण्यात आली ? आणि प्रदीश शर्मा कोण आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल | तर जाणून घेऊयात कोण आहे प्रदीप शर्मा ?
प्रदीप शर्मा मुंबईच्या पोलिस विागातील एक गाजलेलं नाव. ११२ एनकाउंटर करण्याचे श्रेय प्रदीप शर्मा यांना दिले जाते. मात्र आता प्रदीप शर्मा हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले त्याचे कारण म्हणजे एंटालिया प्रकरण आणि मनसुख हिरेन याची हत्या. प्रदीप शर्मा यांना लखन भैय्या फर्जी एनकाउंटर मध्ये दोषी ठरवण्यात आले असल्यापासून त्यांचे नाव जरा नकारात्मक पद्धतीनेच घेतले जाते. या प्रकरणातून ते सुटले होते मात्र त्यांना पोलिस खात्यातून काढण्यात आले, ज्याविरोधात त्यांनी महाराष्ट्र एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल येथे तक्रार दाखल केली. आणि २०१७ मध्ये ते पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिस सेवेत रुजू झाले. त्यावेळेला ते ठाण्यात एन्टी एक्सटर्नल सेल मधअये काम करत होते. आता इथे लक्षात येण्यासारखी बाब म्हणजे त्यावेळेला तोथील पोलिस आयुक्त होते परमबीर सिंह | सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांच्यासोबत देखील प्रदीप शर्मांनी आधी काम केले आहे. एकूणच ही सर्व नावे एक मेकांशी संबंधित आहेत.
जुलै २०१९ मध्ये प्रदीप शर्मांनी पोलिस खात्यातून राजीनामा दिला आणि ‘शिवसेना’ या पक्षाची सदस्यता स्वीकारली आणि नालासोपारा विधानसभा सीटवरून निवडणूक लढवली मात्र ते पडले. त्यांना हार पत्करावी लागली. यातून त्यांचे ‘शिवसेना कनेक्शन’ देखील लक्षात येते. एकूण काय तर ही सर्व नावे, आणि त्यांचे शिवसेनेशी असलेले कनेक्शन हे अतिशय प्रश्नार्थक आहे, आणि सामान्य माणसाचा मनात शंकेची पाल चुकचुकते कि या संपूर्ण प्रकरणात पोलिस दलाच्या या अधिकाऱ्यांना सरकारचा पाठींबा तर नाही ना ?
एनआयए ने प्रदीप शर्मा यांना अतिशय गंभीर अरोपांखाली अटक केली आहे. प्रदीप शर्मा यांच्यात ‘कटात सामिल होणे आणि पुरावे नष्ट’ करण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. आणि त्याच आधारावर त्यांना अटक करण्यात आली आहे. एकूण काय तर हे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गूढ होत चालले आहे.
आता मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लोकांची संख्या ५ झाली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सचिन वाझे, रियाजुद्दीन काजी, सुनील माने व विनायक शिंदे यांची नावे सामिल आहेत, आता त्यांच्या सोबत आणखी एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे प्रदीप शर्मा. एकूण के प्रकरण कुठपर्यंत जातं, या प्रकरणाची पाळंमुळं कुठ पर्यंत रोवलेली आहेत, आणि यातून काय भयंकर सत्य समोर येणार हे तर काळच सांगू शकेल.
