गेलेले आमदार परतणार अन् नारायण राणेंचं मंत्रिपदही जाणार – वैभव नाईक

ठाकरे आणि राणे वाद तसा जुणाच आहे. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन पासून त्यात अजूनच भर पडली आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी शिंदे गट , भाजप आणि राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणे यांचं मंत्रिपद दोन ते तीन महिन्यात जाणार हे भाकीत नसून वस्तुस्थिती आहे.असं देखील वैभव नाईक यांनी पुढे म्हटलं आहे. नारायण राणे यांचं शिवसेनेवर टीका करण्याचं काम होतं. ते काम आता संपलेलं आहे त्यामुळे त्यांचं मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार आहे, असा दावा वैभव नाईक यांनी केलाय.

नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभं करायचं आहे. मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मी नाराज आहे, मी शिंदे गटात जाणार आहे असा संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे. जे आमदार आमच्यातून निघून गेलेत ते आमदार आमच्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळत आहे. त्यांची मलिन झालेली प्रतिमा आणि उद्धव ठाकरेंचे सरकार पाडल्याबद्दल जनतेत रोष आहे. त्यामुळे हे आमदार परत यायला तयार असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.