पालघर समुद्र किनाऱ्याजवळ आढळली संशयास्पद बोट; बोटीत पाकिस्तानी नागरिक

पालघरच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी नागरिक असलेली बोट आढळेलेली आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नौदल आणि तटरक्षक दलाला ही बोट सापडली आहे. तसेच यामध्ये दोन पाकिस्तानी तर 13 भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. संशयित बोट दिसल्याचा कॉल आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. याबा.बत अधिक माहिती अशी की, मुंबई अरेबियन कोस्ट किनाऱ्याजवळ आज एक संशयास्पद बोट दिसली. ही बोट रायगडच्या किनारपट्टीवर आढळल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२६-११ च्या हल्लानंतर समुद्रातील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवते त्यांच्याकडून आणि नेव्ही कडून मुंबई पोलिसांना आणि इतर एजन्सींना माहिती देण्यात आली. की एक संशयास्पद बोट मुंबई किनाऱ्याजवळ लाईट हाऊस आहे. या ठिकाणी आढळली या बोटीमध्ये दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळताच सगळ्या यंत्रना संक्रीय झाल्या यानंतर या बोटीचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलिसांची सागरी पोलिस टीम या बोटीचा शोध घेत आहे. ही धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. यानंतर या बोटीचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलिसांची सागरी पोलिस टीम या बोटीचा शोध घेत आहे. दरम्यान, गतवर्षी सप्टेंबर महिन्यात उरण येथील करंजाजवळच्या समुद्रात संशयास्पद मासेमारी बोट सापडली होती.

नौदला आणि तटरक्षक दलाला बोट सापडली आहे. पालघरपासून ४४ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात बोट सापडली आहे. बोटीचं नाव जलरणी असल्याची माहिती मिळत आहे. त्या बोटीत एकूण १५ जण आढळले आहेत. त्यामध्ये दोन लोक पाकिस्तानी तर बाकीचे १३ जण भारतीय असल्याचे ते सांगत आहेत, अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कागद पत्रांची तपासणी चालू आहे. तब्बल ३-४ तासांनंतर ही बोट सापडली आहे. पुढील तपास चालू आहे.