वर्षभरापूर्वी राज्याच्या राजकारणात शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड आणि त्याला शिवसेनेतील चाळीसच्या आसपास आमदारांनी दिलेला पाठिंबा यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे तसेच या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. तसेच आमदारांपाठोपाठ खासदारांचा मोठा गटही शिंदे यांच्या मागे गेल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा आव्हान उभा राहिलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंड तसेच या बंडाला आमदार-खासदारांनी दिलेला पाठिंबा शिवसेनेमध्ये पडलेली फुट, दोन गटामुळे पक्षासमोर आणि उद्धव ठाकरे समोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत संसार थाटला व मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीवर विराजमान झाले. शिंदे गट व भाजपमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे आतापर्यंत चित्र होते. परंतु, शिंदे गटाच्या एका नेत्याने खंत व्यक्त केली आहे. भाजप आम्हाला सापत्न वागणूक देत असल्याचे शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांनी सांगितले होते. यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
भाजपाकडून सापत्न वागणूक मिळते असं बोललोच नाही तो शब्द माझ्या तोंडी घातला गेला. आमची आणि भाजपाची युती झाली आता आम्ही एनडीएचे घटक आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आम्ही खासदार म्हणून भाजपासह गेलो. असे किर्तीकर म्हणाले.
